Advertisement

Live update : India Vs Pakistan

SHARE

भारत पाकिस्तान या दोन देशातील परिस्थितीची सर्व माहिती एका क्लिकवर

LIVE UPDATES

09:38 AM, May 09 IST
अमृतसर डीपीआरओ नागरिकांना घरात राहण्याची आणि खिडक्यांपासून दूर राहण्याची विनंती करतात.

सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी घरातच थांबावे, खिडक्यांपासून दूर राहावे, घरातील दिवे बंद ठेवावेत आणि खिडक्यांचे पडदे लावून घ्यावेत. "घाबरण्याची गरज नाही, थोड्याच वेळात सायरन वाजेल आणि परिस्थिती ठीक झाल्यावर आम्ही पुन्हा संदेश देऊ. आपले सैन्यदल आपले काम चोखपणे करत आहे, त्यांना घरात राहून सहकार्य करा. घाबरण्याची गरज नाही," असे निवेदन आहे.

09:36 AM, May 09 IST
जम्मूतील सीमावर्ती भागातील नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान
07:39 AM, May 09 IST
बीएसएफनं जैश ए मोहम्मदचा डाव उधळून लावला

बीएसएफनं जैश ए मोहम्मदचा डाव उधळून लावला आहे. जैश-ए- मोहम्मदचे 12 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते त्यापैकी 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे. 

07:38 AM, May 09 IST
पाकिस्तानचे 50 ड्रोन्स भारताने पाडले

भारताने गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानचे ५० ड्रोन्स निकामी केले आहेत. उधमपूर, संभा, जम्मू, अखनूर आणि पठाणकोट या ठिकाणी हे ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आणि हे ड्रोन हाणून पाडले.

07:18 AM, May 09 IST
"भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही", भारत-पाकिस्तान तणावावर अमेरिकेची भूमिका; जेडी व्हान्स म्हणाले, "आम्हाला अडकायचं नाही"
12:05 AM, May 09 IST
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना मध्यावधीतच रद्द
12:03 AM, May 09 IST
जम्मूमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मेहबूबा मुफ्ती यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
11:59 PM, May 08 IST
एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना; तीन तास आधी विमानतळावर पोहचा

भारत-पाकिस्तान दरम्यान सायंकाळ नंतर ड्रोन हल्ले सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने प्रवाशांसाठी नव्या सूचना जाहीर केल्या आहेत. विमान उड्डाणाच्या वेळेआधी किमान तीन तास लवकर विमानतळावर पोहोचावे, असे एअर इंडियाने प्रवाशांना सांगितले आहे. उड्डाण घेण्याच्या 75 मिनिटं आधी आता चेक-इन काऊंटर बंद करण्यात येणार आहे.

‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा