Advertisement

विनायक सावरकरांचा दादरमधील बंगला पाडला जाण्याची शक्यता

याजागी नवीन इमारत उभारली जाण्याची शक्यता आहे.

विनायक सावरकरांचा दादरमधील बंगला पाडला जाण्याची शक्यता
SHARES

विनायक दामोदर सावरकर यांचे पूर्वीचे निवासस्थान असलेले सावरकर सदन लवकरच पाडले जाऊ शकते. याजागी नवीन इमारत उभारली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. 

‘सावरकर सदन’ या ऐतिहासिक इमारतीच्या पुनर्विकासाला रहिवाशांनी संमती दिल्याची माहितीही हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. काही रहिवाशांनी तर त्यांच्या सदनिका एका विकासकाला विकल्याही आहेत.

“बाहेरून इमारत व्यवस्थित दिसते, कारण नुकतीच रंगकाम करण्यात आली आहे. पण आतून ही रचना खचत चालली आहे आणि वारंवार पाण्याच्या गळतीचे प्रकार घडतात,” अशी माहिती इथल्या एखा रहिवाशाने HT ला नाव सांगण्याच्या अटीवर दिली. 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट पुनर्विकसित इमारतीच्या मजल्यावरील जागेत सावरकरांना समर्पित अधिक मोठ्या संग्रहालयासाठी जागा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. याशिवाय, त्यांना ‘सावरकर सदन’ हेच नाव या मजल्याला कायम ठेवायचे आहे, अशी माहितीही या सूत्रांनी दिली.

मात्र काही जण या ऐतिहासिक वास्तूच्या पुनर्विकासास विरोध करत आहेत. त्यांनी न्यायालयात आणि शासकीय संस्थांकडे धाव घेत ‘हेरिटेज दर्जा’ आणि ‘राष्ट्रीय महत्वाच्या स्मारक’ असा दर्जा मिळवून देण्याची मागणी केली आहे.

"जर भाजपला सावरकरांबद्दल खरंच आदर असेल, तर त्यांनी सावरकर सदनला कोणतीही विलंब न करता ‘हेरिटेज’ दर्जा द्यावा," अशी मागणी इमारतीचे माजी रहिवासी प्रा. पंकज फडणीस यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना केली.

सावरकर सदन ही इमारत 1938 साली शिवाजी पार्कमधील सुमारे 405चौ. मीटर जागेवर दोन मजली बंगल्या स्वरूपात उभारण्यात आली होती. या ठिकाणी ‘अभिनव भारत’चे संस्थापक आणि हिंदू महासभेचे प्रमुख नेते विनायक दामोदर सावरकर वास्तव्यास होते.

या बंगल्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली होती. 1940 साली नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांची भेट इथेच झाली.

सावरकर सदनचा राजकीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठा वारसा असल्याने त्याच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर सावरकर अनुयायांमध्ये संतापाचे वातावरण आहे.



हेही वाचा

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे राजकीय उत्सुकता शिगेला

लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा