Advertisement

देशातील पहिला 'फॉरेस्ट वॉक वे' अखेर मुंबईकरांसाठी खुला

तिकीट आणि वेळ जाणून घ्या

देशातील पहिला 'फॉरेस्ट वॉक वे' अखेर मुंबईकरांसाठी खुला
SHARES

मुंबईतील मलबार हिलच्या हिरवळीत वसलेले एक नव इको-टुरिझम आकर्षण म्हणजे एलिव्हेटेड नेचर ट्रेल हे गुढी पाडव्याला सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.

राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत हा खुला करण्यात आला. मलबार हिल येथे तयार करण्यात आलेला नेचर वॉक वेला 'निसर्ग उन्नत मार्ग' असे नाव देण्यात आले आहे.

470 मिटर लांबीच्या वॉक वेवर चालताना मुंबईच्या मलबार हिल इथे असलेल्या जंगलाचा विविध झाडे, वनस्पती, पक्षी प्राणी यांचा आनंद घेता येणार आहे. या पुलामुळे मुंबईच्या पर्यटनात आणखी एका पर्यटन स्थळाची भर होणार आहे.

निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण 485 मीटर आणि रूंदी 2.4 मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी 'सी व्हिविंग डेक' देखील बांधण्यात आला. 

फॉरेस्ट वॉकवेसाठी भारतीय नागरिकांसाठी प्रवेश शुल्क  25 आहे, तर विदेशी पर्यटकांसाठी ते 100 आहे. या वॉकवे वर सुरक्षेच्या अनुषंगाने विशिष्ट अशी सीसीटीव्ही नियंत्रण सिस्टम बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गावर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.

तसेच अग्निशामक यंत्रणा आणि फायर अलार्म सिस्टम ही या वॉक वे वर लावण्यात आलेली आहे या सोबतच एक आपत्कालीन एग्जिट ही असणार आहे. ऑनलाइन तिकीट नोंदणीतील बारकोडवर प्रवेश आणि निर्गमसाठीचा पर्याय दिला आहे. 

निसर्ग उन्नत मार्ग दररोज पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे. येथे जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एकावेळी 200 व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. 



हेही वाचा

मुंबईत पहिले हॉर्स कॅरोसेल उभारले जाणार

उघड्यावर कचरा जाळणं पडू शकतं महागात

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा