Advertisement

मुंबईत भारतातील सर्वात मोठे खाजगी रुग्णालय उभारले जाणार

या प्रकल्पासाठी 6000 कोटी रुपये खर्च येणार असून या रुग्णालयाला अदानी हेल्थ सिटीज असे नाव देण्यात येईल.

मुंबईत भारतातील सर्वात मोठे खाजगी रुग्णालय उभारले जाणार
(Representational Image)
SHARES

अदानी ग्रुपने मुंबई (mumbai) आणि अहमदाबादमध्ये दोन प्रमुख आरोग्यसेवा कॅम्पस बांधण्याची योजना जाहीर केली आहे. या प्रकल्पासाठी 6000 कोटी रुपये खर्च येणार आहेत. तसेच त्याला अदानी हेल्थ सिटीज असे नाव देण्यात येईल. या योजनेसाठी ही कंपनी अमेरिकास्थित असलेल्या मेयो क्लिनिकसोबत भागीदारी करत आहे.

मुंबई कॅम्पसमध्ये 1,000 खाटांचे रुग्णालय असेल. ते शहरातील सर्वात मोठे खाजगी रुग्णालय (Hospital) असेल. सध्या, सर्वात मोठे खाजगी रुग्णालय (Private Hospital) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आहे ज्यामध्ये 750 खाटांची क्षमता आहे. तसेच हे भारतातील (india) सर्वात मोठे हॉस्पिटल असणार आहे.

सेव्हनहिल्स हॉस्पिटलमध्ये 1,500 खाटांची क्षमता आहे, परंतु कायदेशीर अडचणींमुळे फक्त 400 खाटा उपलब्ध आहेत.

अहमदाबादमध्ये, अदानी ग्रुप एक वैद्यकीय महाविद्यालय बांधेल. ते दरवर्षी 150 पदवीपूर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देईल. यात स्टेप-डाउन आणि ट्रान्झिशनल केअर सुविधा असतील. तसेच प्रगत संशोधन सुविधा देखील समाविष्ट असतील.

मेयो क्लिनिक क्लिनिकल प्रक्रिया आणि ऑपरेशन्सवर सल्ला देईल. ही संस्था आरोग्यसेवेत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यास देखील मदत करेल. डिजिटल प्रणाली आणि उपचारांचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

अदानी समूहाची योजना इतर भारतीय शहरे आणि ग्रामीण भागातही अशीच कॅम्पस बांधण्याची आहे. हा उपक्रम त्यांच्या ना-नफा आरोग्यसेवा विभागामार्फत राबविला जाईल. परवडणारे वैद्यकीय शिक्षण आणि उच्च दर्जाचे आरोग्यसेवा प्रदान करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

हिंदुस्थान टाईम्सच्या अहवालानुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष म्हणाले की मेयो क्लिनिकसोबतच्या भागीदारीमुळे भारतातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावेल. जटिल रोग उपचार आणि वैद्यकीय नवोपक्रमावर लक्ष केंद्रित केले जाईल.



हेही वाचा

जोगेश्वरी टर्मिनस सहा महिन्यांत सुरू होणार

मालवणी-एव्हरशाईन नगर खाडीवरील पुल पुन्हा खुला करण्याची मागणी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा