Advertisement

मध्य रेल्वेकडून कर्जत-पनवेलसाठी चौथ्या लेनची योजना

या मार्गामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे यांच्यात थेट संपर्क साधता येईल अशी अपेक्षा आहे.

मध्य रेल्वेकडून कर्जत-पनवेलसाठी चौथ्या लेनची योजना
SHARES

मुंबई महानगर प्रदेश (MMR) अंतर्गत कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने कर्जत आणि पनवेलला जोडणाऱ्या नवीन चौथ्या रेल्वे मार्गाच्या योजनेला मध्य रेल्वेने मान्यता दिली आहे. 29 किमी लांबीच्या या मार्गामुळे नवी मुंबई (navi mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे यांच्यात थेट संपर्क साधता येईल अशी अपेक्षा आहे.

7 एप्रिल 2023 रोजी रेल्वे बोर्डाला 491 कोटी रुपयांचा अंतिम तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्देश व्यस्त कर्जत-पनवेल कॉरिडॉरवरील गर्दी कमी करणे आणि त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणे आहे.

ही नवीन रेल्वे लाईन मुंबई (mumbai) रेल विकास कॉर्पोरेशनने विकसित केलेल्या दोन अतिरिक्त उपनगरीय लाईन्ससोबत जोडण्यात येईल. या लाईन्स डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहेत.

सध्याची लाईन प्रामुख्याने मालवाहतूक आणि मर्यादित लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांंच्या सेवा पुरवते. तसेच क्षमता वाढविण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन लाईन सध्याच्या पायाभूत सुविधांप्रमाणेच तयार करण्यात येईल.

सुधारित उपनगरीय कॉरिडॉरमध्ये मुंबई नेटवर्कमधील काही सर्वात लांब पूल आणि बोगदे समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. हा उपक्रम मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प 3 (MUTP-3) चा एक भाग आहे. ज्याचा उद्देश या प्रदेशातील वाहतूक पर्यायांमध्ये प्रगतशील विकास घडवणे आहे.

मध्य रेल्वे या कॉरिडॉरसाठी (corridor) तीन लोकल ट्रेन देखील तयार करत आहे. एकंदरीत, नवीन रेल्वे मार्गामुळे वाहतूक मार्गांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे पुण्यातील प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळावर प्रवास करणे अधिक सुलभ होईल.

तसेच एमएमआरमध्ये एकूण कनेक्टिव्हिटी वाढेल, विशेषतः पनवेल, कर्जत आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) या विकसित होणाऱ्या प्रदेशांना याचा फायदा होईल.



हेही वाचा

मुंबईत 3 जूनपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी

राज्य सरकारची कृत्रिम वाळूच्या वापराला मान्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा