महाराष्ट्रात (maharashtra) जीबीएस आजाराने आतापर्यंत जवळपास 8 जणांचा जीव घेतला आहे. यातील एक मृत रुग्ण हा मुंबईतील आहे. पुण्यात (pune) या आजाराच्या रुग्णांची संख्या जास्त असून मृतांची संख्या 7 वर गेली आहे.
मुंबईत (mumbai) आतापर्यंत किमान तीन गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील जीबीएस सर्वात लहान विषाणूची रुग्ण असलेली 13 वर्षांची मुलगी (13 yr girl) महापालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
नायर रुग्णालयाचे डीन डॉ. शैलेश मोहिते यांनी द फ्री प्रेस जर्नलला माहिती दिली की, जीबीएस विषाणूने बाधित अल्पवयीन मुलगी रुग्णालयात दाखल आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, मुंबईत पहिला जीबीएस मृत्यू झाला. "रुग्णाला 23 जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 फेब्रुवारी रोजी रात्री 11.10 वाजता या रुग्णाचे निधन झाले. सुभाष देटे असे मृताचे नाव आहे," असे डॉ. मोहिते म्हणाले.
वृत्तानुसार, सुभाष देटे (53) सांताक्रूझमधील (santacruz) महापालिका संचालित व्ही.एन. देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होते. नायर रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु, त्यांचा विषाणूमुळे मृत्यू झाला.
यामुळे राज्यातील जीबीएसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सातवरून आठ झाली आहे. यापूर्वी, मुंबईत 64 वर्षीय महिलेला जीबीएस सिंड्रोम असल्याचे निदान झाले तेव्हा पहिलाच रुग्ण आढळला होता.
हेही वाचा